एड्स दिनानिमित्त खुपिरे ग्रामीण रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

करवीर : १ डिसंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधुन ग्रामीण रुग्णलय खुपिरे येथे बऱ्याच कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

यामधे खूपिरे गावातून रैली चे आयोजन केले. यामधे सर्व मुला व मुलींनी सहभाग घेतला तसेच नर्सिंग कॉलेज च्या मुलींनी पोस्टर प्रदर्शन केले व यातून प्रथम,द्वितीय,तृतिय , क्रमांक काढून बक्षिस् दिले सर्व मान्यवरानी मार्गदर्शन केले

या कार्यक्रम साठी वैद्यकिय अधीक्षक डॉ सुधाकर ढेकळे,PSM विभागप्रमुख् डॉ गंधम, ICTC टेक्निशन सतीश पिसाळ, महादेव कांबळे ग्रामीण रुगनालय व मेडिकल कॉलेज व RBSK चे सर्व अधिकारी व कर्मचारी हजर होते