कडगांव (वार्ताहर) : बिद्री कारखान्याचे खरे मालक हे कारखान्याचे 60 हजार सभासद आहेत. के.पी.पाटील यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे या 60 हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचाच ऊस कारखान्याला जातो. त्यांना तोडणी वाहतूक सुरूळीत करण्यापेक्षा कारखान्यामध्ये भ्रष्टाचार करणे महत्वाचे वाटते. त्यांच्या या बनवाबनवीच्या कारभारामुळे त्यांचा पराभव अटळ असल्याचे प्रतिपादन माजी सभापती बाबा नांदेकर यांनी केले ते कडगांव येथील जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी बोलतना नांदेकर म्हणाले की, स्वत:च्या फायद्यासाठी लै भारी चेअरमनांनी काखान्यामध्ये परमनंट नोकर भरती केलेली नाही. त्याउलट कारखान्यामध्ये दरवर्षी शेकडो कर्मचारी चिट्टीवर घेतात. या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मागील 5 वर्षामध्ये 13 ते 14 कोटी रुपयांची खंडीत बिले खर्ची टाकली आहेत. त्यांचे कडगाव-पाटगांव भागावर विशेष प्रेम असून ते याभागातील शेतकऱ्यांवर व तरुणांवर वारंवार अन्याय करत आहे.
बिद्री ही आपली मातृसंस्था आहे. सर्वांनीच आपल्या मातृसंस्थेची जबाबदारीने जपणूक केली पाहिजे. मात्र सत्ताधारी मंडळींकडून मातृसंस्थेला शोभणारे असे आदर्शवत काम होत नाही. निवडणुका आली की सत्ताधारी मंडळी ऊसविकास तोडणी कार्यक्रम आणि नोकर भरतीचा केवळ खोटा दिखावा करतात . मात्र निवडणुका संपल्या की जाणीवपूर्वक ही मंडळी या बाबींकडे दुर्लक्ष करतात.
यावेळी बोलताना भाजपा नेते नाथाजी पाटील म्हणाले, के.पी.पाटील यांनी सहजीव प्रकल्पामध्ये गेल्या 5 वर्षात 96 कोटी रुपयांचा नफा दाखवून 96 कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे.कारखाना प्रशासनाकडून मोलॅसिस विक्री करतेवेळी जिल्ह्यातील इतर सहकारी साखर करखान्यापेक्षा 500 ते 1000 रुपयांपर्यंत किती किंमतीने विक्री करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान त्यांनी केले आहे. काकडे साहेब, विठ्ठलराव खोराटे, रणजित पाटील व मी कारखान्यावर प्रशासक म्हणून कार्यरत असताना शेतकऱ्यांना एफ.आर.पी.पेक्षा 305 रुपये अधिक दिले होते. परंतू चेअरमन के.पी.पाटील असे न करता शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केले असून त्यांना सभासद त्यांची जागा दाखवतील असे ते म्हणाले.
यावेळी खासदार धनंजय महाडीक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, कोकण केसरी के.जी.नांदेकर, बाबासाहेब पाटील, निवासराव देसाई, संदीप वरंडेकर, सर्जेराव देसाई, टी.एस.देसाई, विलासराव झोरे, संग्राम सावंत, देवराज बारदेस्कर, विजय पाटील, दिगंबर देसाई, पंढरीनाथ पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी अस्वले यांच्यासह प्रमुख मान्यवर, उमेदवार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गट क्र.6 मधून मताधिक्य देणार
गट क्र.6 मधील अनेक गावात प्रचाराच्या निमित्ताने फिरताना परिवर्तन आघाडीला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विजय निश्चित झाला आहे. गट क्र.6 मधील जनता स्वाभिमानी असल्याने प्रत्येक गावात आम्हाला मताधिक्य मिळणार असून गट क्र.6 मधून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे बाबा नांदेकर म्हणाले.