मायग्रेनचा त्रास होतोय ; तर करा आहारात हा बदल…

शरीरात जीवनसत्वाची कमतरता असल्यास अनेक आजारांचा व समस्यांचा सामना करावा लागतो. केस गळणे, नजर कमजोर होणे, त्वचा कोरडी होणे, मायग्रेन यासारखे अनेक आजार होतात.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या रिपोर्टनुसार, मायग्रेनचा त्रास हा शरीरात व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, बी5, बी6 आणि व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळं होतो. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं रुग्णांना आठवड्यातील 4 ते 5 वेळा ही समस्या निर्माण होऊ शकते. एका तपासणीत व्हिटॅमिन बी आणि डीच्या कमतरतेमुळं 40 ते 50 टक्के लोक मायग्रेनचा सामना करत आहेत. 

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळं मायग्रेनपासून सुटका मिळू शकते. तसंच, या व्हिटॅमिनयुक्त पदार्थांमुळं शरीरदेखील निरोगी राहते. जाणून घेऊया आहारात कोणते पदार्थ असावेत हे. 

आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

बदामाचे का दूध

– ब्लूबेरी

– संत्री

– सफरचंद

– कीवी

– केळं

– चीज

– ब्रोकोली

– पालक

– कीवी

– मशरूम

– भुईमुगाच्या शेंगा

– रताळे

– कोबी

– लोणी

– पनीर

– दही

– सूका मेवा

व्हिटॅमिन डीची कमतरता 

मायग्रेनचा त्रास व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तर होतोच पण त्याचबरोबर अति प्रमाणात ताण-तणाव, अतिविचार करणे यामुळं देखील मायग्रेनचा व डोकेदुखीचा त्रास जाणवतो. मायग्रेनचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भरून काढावी लागते. त्यासाठी मॅग्निशियम युक्त आहार घेणे गरजेचे आहे. अशावेळी व्हिटॅमिन डीमधून मॅग्शिशियम शरीरापर्यंत पोहोचते. अशावेळी सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करा. तुमच्या आहारातही व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ सामील करा. यामुळं हाडं आणि मांसपेशीयादेखील मजबूत होतात. 

योग्य आहार घेतल्यास मायग्रेनपासून होईल सुटका

योग्य आहार, योग्य उपचार आणि आरामामुळं मायग्रेनची समस्या पूर्णपणे बरी होऊ शकते. त्यामुळं आत्ताच आहारात बदल करुन तुम्ही मायग्रेनवर मात करु शकता.