जीवन पाटील आणि (कै.) संभाजीराव पाटील गटाचा सत्तारूढ आघाडीला पाठिंबा : भुदरगडमध्ये एकतर्फी घोडदौड सुरू

बिद्री : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने कुर (ता. भुदरगड) येथील मागील निवडणुकीतील आमदार आबिटकर आघाडीचे संस्था गटाचे उमेदवार जीवन पाटील यांनी के पी पाटील यांच्या सत्तारुढ महालक्ष्मी आघाडीला आज जाहीर पाठिंबा दिला. यादरम्यान नाधवडे येथील (कै.) संभाजीराव पाटील गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनीही या सत्तारूढ आघाडीस जाहीर पाठिंबा दिल्याने भुदरगड तालुक्यात या आघाडीची एकतर्फी घोडदौड सुरू राहिली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचे या आघाडीच्या वतीने पंडितराव केणे व शामराव देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी बोलताना जीवन पाटील म्हणाले, माझे सामाजिक व राजकीय कार्य सुरू असून बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही के पी पाटील यांच्या विकासाच्या भूमिकेसोबत आहोत.

बिद्री साखर कारखान्याचा कारभार चुकीच्या मंडळींच्या हातात जाऊ नये यासाठी मी सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीला माझ्या कार्यकर्त्यांसह जाहीर पाठिंबा देत असून या आघाडीला मोठ्या फरकाने विजयी करण्याचा आम्ही संकल्प केला आहे.”
यावेळी संदीप पाटील, तुकाराम केंगार,सुरेंद्र धोंगडे,रणजीत पाटील, विनायक खाडे या जीवन पाटील गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह

गोकुळचे संचालक शशिकांत पाटील – चुयेकर, बाबासाहेब चौगले,राहुल देसाई,पी.डी. पाटील,अनिल हळदकर, अनिकेत देसाई, शरद झगडे, सर्जेराव देसाई, राजू इंगळे,बाळासाहेब गुरव आदी उपस्थित होते.

दरम्यान हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणीचे माजी उपाध्यक्ष व नाधवडे येथील दिवंगत नेते संभाजीराव पाटील यांच्या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज माजी आमदार के पी पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीस आपला पाठिंबा जाहीर केला. के पी पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

यावेळी के.डी. पाटील,आबासाहेब भोसले,शंकर पाटील,ए. पी.पाटील,मारुती पाटील, ए.आर.पाटील,शिवाजी पाटील,सुनील पाटील, पांडुरंग गुरव,सचिन पाटील,राहुल भोसले, अरुण भोसले आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. म्हसवेचे सरपंच सर्जेराव देसाई यांनी आभार मानले.

सत्तारूढचाच जोराचा धक्का !यावेळी बोलताना उमेदवार पंडीत केणे म्हणाले, “ज्यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान आमदारांनी मागची बिद्रीची निवडणूक लढविली ते माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी आता सत्तारुढ आघाडीला पाठींबा दिला आहे. त्यांच्यासह माजी आमदार संजयबाबा घाटगे, स्वर्गीय विजयसिंह मोरे यांचा गट व समरजितसिंह घाटगेंचे ज्यांनी नेतृत्व मानले आहे असे सुनीलराव सूर्यवंशी हे सुद्धा राजे तिकडे असताना सत्ताधारी आघाडीत सामील झाले आहेत. आता तर जीवन पाटील व (कै.) संभाजीराव पाटील गटांच्या पाठींब्याने आमच्या सत्तारूढ आघाडीनेच विरोधकांना जोराचा धक्का दिला आहे.