बिद्री : होऊ घातलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार रन धुमाळीत विरोधत कारखान्याचे विद्यमान चेअरमन के पी पाटील यांच्या सक्षम कारभार असताना चुकीचे बिन बुडाचे आरोप करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे .त्यामुळे अशा चुकीच्या अफवावर सुज्ञ सभासदनी विश्वास ठेवू नये असे प्रतिपादन राधानगरीचे ज्येष्ठ नेते भिकाजी एकल यांनी केले.
ते पनोरी (ता- राधानगरी) येथे श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते .सभेच्या अध्यक्षस्थानी शामराव चव्हाण होते .
भिकाजी एकल ,पुढे म्हणाले के पी पाटील यांनी बिद्रीचा कारभार सभासद केंद्रबिंदू मानून ऊसाला उच्चांकी दर देऊ सभासदांचे हित जपले.अशाच चांगल्या हिताच्या आड येणाऱ्यांना सभासद येता ३ तारखेला होणाऱ्या मतदानवेळी धडा शिकवतील.
यावेळी चेअरमन के पी पाटील म्हणाले गेल्या वीस वर्षात बिद्रीच्या वैभवात भर घालणार काम आपण केला असून या कामाची कार्याची नोंद पुरस्काराच्या रूपाने बिद्रित प्राप्त झाले आहे .विरोधकांच्या आरोपाचे खंडन करताना म्हणाले विरोध करत असलेले आरोप बिनबुडाचे व खोडसाळ आहे हे सुद्धा सभासद जाणून आहेत.
स्वार्थी व भ्रष्टाचाराने भडभलेल्या लिमिटेड लोक नेत्यांची टोळी बिद्रीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने एकत्र जमले आहेत .हा हल्लाच सुज्ञ सभासदच मतपेटीतून ही टोळी हातभार करतील .
यावेळी स्वागत व प्रास्ताविक शशिकांत कांबळे यांनी केले .यावेळी शामराव चव्हाण, विष्णू कलिकत्ते, सागर खेडेकर ,दत्तात्रय पातले ,आदी सह महालक्ष्मी आघाडीचे उमेदवार उपस्थित होते .