बिद्री कारखान्यामध्ये परिवर्तन अटळ:खासदार धनंजय महाडिक

वडकशीवाले( प्रतिनिधी) : बिद्री कारखान्यामध्ये परिवर्तन करायचेच अशी पक्की खून गाठ बांधून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सगळी मंडळी एकत्र आली आहेत.बिद्री कारखान्याची ही निवडणूक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कामगारांच्या प्रपंचाशी आणि चुलीशी निगडित आहे. ही निवडणूक सभासदांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलासा देणारे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. परिवर्तन आघाडीचे कपबशी हे शुभचिन्ह असल्याने परिवर्तन अटळ असल्याचे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. वडकशीवाले ता. करवीर येथे शेतकरी परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, चुकीची गोष्ट वारंवार सांगितली की लोकांना पटते. असे त्यांना वाटते म्हणूनच के पी साहेब लैय भारीची…’ जाहिरातबाजी करत स्वत:च टिमकी वाजवत फिरत आहेत. एफआरपी प्रमाणे दर देवून सभासदांच्यावर उपकार केले काय? कायद्याने तो दर द्यावाच लागतो हे आता सभासदांना समजले आहे. यावेळी जनतेतून उठाव चांगला आहे. परिवर्तनाच्या लढाईत सभासदांनी आम्हाला साथ द्यावी. कारखान्याचा कारभार आदर्श कसा असतो हे आम्ही दाखवून देऊ.

भाजपाचे नेते राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले,बिद्री ही आपली मातृसंस्था आहे. सर्वांनीच आपल्या मातृसंस्थेची जबाबदारीने जपणूक केली पाहिजे. मात्र सत्ताधारी मंडळींकडून मातृसंस्थेला शोभणारे असे आदर्शवत काम होत नाही. निवडणुका आली की सत्ताधारी मंडळी ऊसविकास तोडणी कार्यक्रम आणि नोकर भरतीचा केवळ खोटा दिखावा करतात . मात्र निवडणुका संपल्या की जाणीवपूर्वक ही मंडळी या बाबींकडे दुर्लक्ष करतात.

यावेळी बोलताना ए.वाय.पाटील म्हणाले की, के.पी.पाटील यांनी सर्वसामान्य नागरीकांना सोबतच आमच्या सारख्या नेत्यांनाही वेळोवेळी फसविण्यांचे काम केले आहे. आम्ही कोणत्याही स्वार्थासाठी परिवर्तन आघाडीत आलो नाही तर पारदर्शक कारभारासठी आणि सभासदांच्या हितासाठी आम्ही परिवर्तनची लढाई उभी केली आहे. या परिवर्तन लढाईला दिवसागणिक पाठिंबा वाढत चालला असून परिवर्तन होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, खा धनंजय महाडिक,खा. संजयदादा मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, समरजीतसिंह घाटगे, ए वाय पाटील यासह परिवर्तन आघाडीचे उमेदवार यांनी वडकशिवालेसह कावणे,चुये,येवती,खेबवडे गावांमध्ये झंझावाती प्रचार दौरा केला. 

    यावेळी बाजार समितीचे माजी सदस्य उदय पाटील, प्रताप पाटील, तानाजी पाटील, प्रविण पाटील, भिमराव पाटील, उत्तम पाटील, माणिकराव पाटील, कृष्णात  राजीगरे, रणजित पाटील, बाबुराव पाटील, सदाशिव नाळे,दादा पाटील, शहाजी नाळे,कैलाश शेळके आदी हजर होते.

संचालकांची घुसमट…
प्रचार दौऱ्यात खा. मंडलिक म्हणाले,के पी पाटील आणि हसन मुश्रीफ याना सत्तेमध्ये इतर नको आहेत. त्यांच्याकडून कारखान्याचा कारभार एकाधिकारशाहीपणे चालू आहे. सहकारी संचालकांना विश्वासात घेतले जात नाही. कधी मान सन्मान दिला नाही संचालकांची कायमपणे घुसमट होत राहिली आहे. संचालकाना बेदखल करून आपलेच घोडे दामटण्याचा नेहमी ते प्रयत्न त्यांच्या मनमानी कारभाराला थांबवण्याची हीच वेळ आहे.