ग्रामपंचायत रेंदाळ येथे संविधान दिन उत्साहात साजरा…

रेंदाळ : ग्रामपंचायत रेंदाळ येथे (25 नोव्हेंबर) संविधान दिना रोजी सकाळी 10:30 वाजता भारतीय संविधान दिन प्रतिमा पूजन करून आणि सामूहिक संविधानाचे वाचन करून ग्रामपंचायत सभागृहामध्ये साजरा करण्यात आला.

सरपंच सुप्रिया भरत पाटील यांच्या हस्ते आणि ग्रामपंचायत सदस्य शिक्षण सभापती रणजित खोत, ग्रामपंचायत सदस्य बांधकाम सभापती मुकुंद पतंगे, ग्रामपंचायत सदस्या अनिता शिंगे, ग्रामपंचायत सदस्य महेश वाइंगडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला.

यादरम्यान सुट्टीचा दिवस असल्यामुळे सरपंच यांनी कर्मचाऱ्यांना सांगून लोकप्रतिनिधी ना संपर्क करण्याबाबत सूचना दिली होती जितके लोकप्रतिनिधी हजर राहिले त्यांच्या उपस्थिती मध्ये संविधान दिन साजरा करण्याचे सरपंच यांनी सूचित केले.

यादरम्यान काही पदाधिकारी यांचा ग्रामपंचायत बाबत गैरसमज झाला याबद्दल सरपंच यांनी काही गैरसमज झाला असल्यास दिलगिरी व्यकत करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक असून पुढील वर्षांपासून संविधान दिन हा नागरिकांच्या सूचनेनुसार आणि ग्रामपंचायतच्या पदाधिकारी यांना कळविण्यात येऊन मोठया प्रमाणात साजरा केला जाईल.