कोल्हापूर : कांतीलाल चोरडिया यांच्यावर कोल्हापुरात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जात आहेत.कांतीलाल चोरडियांवर 60 कोटी रुपयांची 20 हजार स्क्वेअरफूट जमीन बनावट कुलमुखत्यारपत्र करून हडपल्याची तक्रार जिंतेंद्र राचोजीराव जाधव यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कांतीलाल चोरडिया यांचे सख्खे बंधू ईश्वरलाल चोरडिया यांच्याच बंगल्यावर अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली होती. तक्रारदार जाधव यांनी कांतीलाल चोरडिया यांनी बाबासाहेब गणेश देसाई (रा. शाहूपुरी, कोल्हापूर), बाबासाहेब पांडूरंग जाधव (रा. शाहुपुरी, कोल्हापूर) नितीन श्रीकांत चौगुले (रा. शाहुपुरी, कोल्हापूर) आणि एस. बी. पाटील (रा. शाहुपुरी, कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार जाधव यांची कोल्हापुराती शिवाजी पार्कमध्ये 20 हजार स्क्वेअरफूट वडिलापार्जित जागा आहे. याठिकाणी त्यांचे राहतं घर सुद्धा आहे. याच जागेचं बनावट वटमुखत्यारपत्र करून जागा हडप केल्याचा आरोप आहे. याच जागेचं बनावट कुलमुखत्यारपत्र करून जागेचा दस्त नोंदणी केल्याचा आरोप तक्रारदार जाधव यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती पाच महिन्यांपूर्वी समोर आल्यानंतर तक्रार दाखल केल्याचे जाधव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
