आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) नव महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री व पंचायतराजचे जनक माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्त राज्याचे माजी गृहमंत्री आ.सतेज पाटील यांच्या हस्ते व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार तसेच माजी मंत्री आ.उल्हास पवार, शिक्षक पदवीधरचे आ.जयंत आसगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद येथे यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्व.यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या कृषी,अर्थ,सहकार शिक्षण,सिंचन व संरक्षण सारख्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले असुन ते संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. आज त्यांची ३८ वी पुण्यतिथी असल्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद आवारात उभारलेल्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे व नितीनभाऊ पाटील व गणेश जाधव,अमर पाटील, निलेश सरनाईक, विनय कदम, महिला शहराध्यक्षा पद्मजा तिवले व महिला अध्यक्षा आश्विनी माने, रामराजे कुपेकर याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अशोक पोवार, समीर देशपांडे, विराज पवार,गजानन साळोखे, रमेश मोरे, रामराजे बदले, मुसाभाई कुलकर्णी,महादेव पाटील,राजु मालेकर, गणेश नलवडे, सादिक आत्तार, चंद्रकांत सुर्यवंशी, आदित्य निळकंठ, संदिप साळोखे,जयकुमार शिंदे, श्रीकांत पाटील, पंडित कळके,आनंदा जाधव, महादेव पाटील तसेच अरूणा पाटील,निता पाटील व वर्षा भोसले इ.महिला कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदचे अधिकारी व मान्यवर उपस्थितीत होते.