राष्ट्रवादीच्या प्रबळ गटाचा परिवर्तन आघाडीला जाहीर पाठिंबा ; के.पी.पाटील यांना मोठा धक्का

गारगोटी प्रतिनिधी,
नाधवडे (ता.भुदरगड) येथील राष्ट्रवादी पक्षाचा मुख्य प्रबळ गट व हुतात्मा स्वामी-वारके सुत गिरणी मुदाळचे माजी व्हा.चेअरमन आणि नाधवडेचे सलग २० वर्षे सरपंच पद भूषविलेले स्वर्गीय संभाजीराव पाटील यांच्या पत्नी माजी सरपंच व विद्यमान सदस्या श्रीमती गिताताई संभाजीराव पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीकरीता राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडीला जाहीर पाठींबा देत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थित आबिटकर गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ‘बिद्री’ चे चेअरमन व माजी आमदार के.पी.पाटील यांना आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

स्वर्गीय संभाजीराव पाटील यांचा आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघात मोठा जनसंपर्क होता आणि आजही त्यांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र संभाजीराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाची माजी आमदार के.पी.पाटील यांच्याकडून मोठी परवड झाली आहे. जणू या गटाला त्यांनी वाळतच ठाकले होते. जातात कुठे? माझ्याच पाठीमागे गुमान येणार आहेत. या आविर्भावात के.पीं.नी त्यांना साधे विचारात सुध्दा घेतले नाही. के.पीं.च्या ‘वापरा आणि फेकून द्या’ नितीला संभाजीराव पाटील गटाचे कार्यकर्ते अक्षरक्ष: कंटाळले होते. याबाबत त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांमधून सतत असंतोष खदखदत होता. आम्हांला एकवेळ पद राहू द्या, पण आमचा योग्य सन्मान राखा. एवढीच माफक आपेक्षा त्यांचे कार्यकर्ते के.पीं यांच्याकडे व्यक्त करत होते. पण के.पींनी आयुष्यभर स्वर्गीय संभाजीराव पाटील यांचा राजकारणासाठी वापर करुन घेतला, मात्र त्यांच्या निधनानंतर यांचा आपल्याला उपयोग होणार नाही अशी भूमिका के.पीं.नी घेत सतत सापत्न भावाची या गटाला वागणूक दिली गेली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्यांमधून तीव्र नाराजीबरोबर असंतोष व्यक्त होत होता. अखेर के.पी.च्या अपमानास्पद वागणूकीला कार्यकर्त्यांनी कंटाळून के.पीं.ना राजकीय रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने स्वर्गीय संभाजीराव पाटील यांच्या पत्नी माजी सरपंच व विद्यमान सदस्या गिताताई पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकत्यांनी ‘बिद्री’ साखर कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर व आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदार संघात राबविलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर आमदार आबिटकर यांच्या सोबत जाण्याचा एकमुखी निर्णय घेत असंख्य कार्यकर्त्यासह गटात जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे माजी आमदार के.पीं पाटील यांना राजकीय दृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी कोकण केसरी के.जी.नांदेकर, निवासराव देसाई (आण्णाजी), माजी संचालक दत्ताजीराव उगले, कल्याणराव‍ निकम, सुर्याजीराव देसाई, वसंतराव प्रभावळे, टी.एस.देसाई (आण्णा), मदनदादा देसाई, भाजपा नेते नाथाजी पाटील, विलास बेलेकर, शामराव पाटील, युवानेते ऋषिकेश पाटील, विश्वास पाटील, धोंडीराम पाटील, तानाजी पाटील, अमर पाटील, भीमराव पाटील, आनंदराव पाटील मेजर, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, रघुनाथ पाटील, कुंडलिक पाटील, तानाजी पाटील, संतोष पाटील, आनंदा कांबळे, संजय पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

नाधवडे गावच्या माजी सरपंच गिताताई पाटील व त्यांचे स्वागत करताना आमदार प्रकाश आबिटकर साहेब के.जी.नांदेकर, निवासराव देसाई, टी.एस.देसाई, वसंतराव प्रभावळे आदी मान्यवर.