लोणचे शब्द ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लोणचे वेगवेगळ्या फळाचे बनवले जाते. आंबा, लिंबू,आवळा, गाजर, कारले यासह अनेक प्रकारचे लोणचे बाजारात उपलब्ध आहेत.भारतीय जेवणाच्या ताटात लोणच्याचा समावेश केला जातो. पण हे आंबट आणि चविष्ट चवीचे लोणचे आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खूप लोणची खाण्याची सवय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

नाश्त्यामध्ये पराठ्यासोबत लोणचे खाणे किंवा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात लोणचे खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. जास्त लोणचे खाण्याची सवय तुम्हाला आजारी पाडू शकते, असे डॉक्टर सांगतात.
जास्त सोडियम
लोणच्यात असलेल्या उच्च सोडियममुळे रक्तदाब वाढते. जास्त लोणचे खाल्ल्याने अतिरिक्त सोडियम क्लोराईडचे सेवन वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि इतर आजार होऊ शकतात.
मूत्रपिंडावर परिणाम
नियमित मध्यम आकाराच्या आंब्याच्या लोणच्यामध्ये 569 मिलीग्राम सोडियम असते. आपल्या शरीराला दररोज 2,300 मिलीग्रामची आवश्यकता असते. लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यास आहारासोबत सोडियमचे प्रमाणही वाढते. त्यामुळे पाणी टिकून राहणे, पोटात सूज येणे, उच्च रक्तदाब आणि किडनीवर परिणाम दिसून येतो. ज्या पदार्थांमध्ये मीठ जास्त असते ते कॅल्शियमचे शोषण कमी करतात. त्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात.
उच्च कोलेस्टरॉल
लोणची बनवताना तेलाचा जास्त वापर होतो. हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. लोणचे वारंवार खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उच्च कोलेस्ट्रॉल केवळ हृदयालाच नाही तर यकृतालाही हानी पोहोचवते. लोणच्याच्या तेलात ट्रान्स फॅट असते, जे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही लोणचे खात असाल तर ते मर्यादित प्रमाणातच खा. प्रत्येक वेळी आपल्या आहारात याचा समावेश न करण्याचा प्रयत्न करा.
