परिवर्तन आघाडीला मिळणारा पाठींबा पहाता कारखान्यात नक्कीच परिवर्तन – ए.वाय.पाटील

सरवडे( प्रतिनिधी)के पी पाटील यांची एकाधिकारशाही ही सभासदांच्या उत्कर्षाला व कारखान्याच्या विकासाला मारक ठरत आहे. लय भारीची टिमकी वाजवणाऱ्या के पी पाटील यांचा कारभार हा सभासदांच्या हिताचा नव्हे, तर स्वहिताचा आहे.परिवर्तन आघाडीला सभासदांचा वाढता प्रतिसाद मिळत असून यंदा कारखान्यात नक्की परिवर्तन होणार”, असा विश्वास.राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी केले.

पनोरी, ता. राधानगरी .येथील भगवान पातले व राधानगरी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी परिवर्तन आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी आयोजित सभेत बोलत होते.

ए. वाय. पाटील म्हणाले, गेली अनेक वर्षे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. एक केलेली मागणी त्यांनी मान्य केली नाही. त्यांची वृती अशी आहे की आजचं मला आणि उद्याच तुला त्यामुळे ते कधीही आपला स्वार्थ बाजूला ठेवणार नाहीत.अशा स्वार्थी वृत्तीला कंटाळून बाहेर पडलो आहे त्यांच्या सत्तेचे केंद्रीकरणच झाले विकेंद्रीकरण त्यांनी केलेच नाही.आगामी काळात बिद्रीत कोजन, इथेनॉलच्या उत्पनातून जनतेला त्यांचा वाटा निश्चित देण्यात येईल.

यावेळी स्वप्निल पातले यांनी स्वागत केले. भगवान पातले ,वसंत चौगुले, तानाजी पवार ,शांताराम पातले ,अनिल पातले, राहुल चौगुले, कपिल पातले, तानाजी पातले ,दगडू कांबळे, संदीप कांबळे, अशोक कांबळे ,सागर साबळे ,अशोक चौगुले उपस्थित होते.

राधानगरी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला.यावेळी के के राजगिरे,भिकाजी हळदकर, बाबुराव बसरवाडकर ,राहुल जरग, सदाशिव पाटील ,अवधूत पाटील, अरविंद बुजरे उपस्थित होते.

🤙 9921334545