कारखान्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : के .पी पाटील यांच्यावर कारखाना चालवताना हुकूमशाहीचा आरोप झाला. पण त्यांनी वेळेवर निर्णय घेतले. वाईट गोष्टी थोपविल्या म्हणून ते हुकूमशहा झाले का असा सवाल करत कारखान्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने धडा शिकवण्याची गरज आहे, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.3 डिसेंबर रोजी श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या वाघापूर येथे झालेल्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, सगळीकडे ऊस आंदोलन चालू असताना सर्वात जास्त एफआरपी देण्याचा विक्रम के .पी .पाटील यांनी केला. त्यांनी कारखान्याच्या कामगारांचे पगार दिले, बोनस दिला.के.पी. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी निर्माण केलेल्या उपकेंद्रातून बिद्रीची वीज जोडणी करून घेतली. कारखान्याच्या सभासदांचा के.पी. पाटलांवर विश्वास आहे. 3800 साखर गेली तर 3500 रुपये एफआरपी देणार अशी ग्वाही के .पी पाटील यांनी दिली. तसेच जे ऊस उत्पादक कारखान्याला ऊस देत नाहीत त्यांना 20 रुपया वरून 15 रुपयांनी साखर देण्याची घोषणाही के. पी .पाटील यांनी केली याचा आनंद असल्याचेही हसन मुश्रीफ म्हणाले. विरोधकांच्या छाताडावर बसून विमानाला निवडून द्यावं असं आवाहनही हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

यावेळी माजी आमदार संजय घाटगे, आमदार सतेज पाटील माजी आमदार के.पी.पाटील,दिनकरराव जाधव ,भैय्यासाहेब माने ,प्रवीण भोसले ,फत्तेसिंह भोसले ,पांडुरंग कांबळे ,सुनील कांबळे, राहुल देसाई आदी उपस्थित होते.

🤙 9921334545