सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण…

.कोल्‍हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत मंगळवार दिनांक १४/११/२०२३ इ.रोजी ७० व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे ध्‍वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्‍हणण्‍यात आली.

यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्‍वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या जयंती निमित्‍त त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाली की सहकारामुळेच कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाला आहे. सहकार वाढवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. तसेच संघातील सर्व घटकांनी आपले कामकाज निस्वार्थ व प्रामाणिक पणे केले पाहिजे यामुळे स्व:ताची,तसेच संस्थेची, दूध उत्पादकांची यातून प्रगती होणार आहे. जिल्‍ह्यातील सर्व सहकारी दूध संस्‍था, दूध उत्‍पादक,अधिकारी व कर्मचारी यांना सहकार सप्‍ताह व बालदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ७० वा सहकार सप्ताह साजरा केला जात असून सहकार सप्ताह निमित्त संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात शनिवार दि.१८ नोव्हेंबर २०२३ दुपारी २.०० वाजता कोल्हापूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

यावेळी स्वागत प्रास्ताविक एम.पी. पाटील यांनी केले.तसेच या कार्यक्रमाचे आभार एस.व्‍ही. तुरंबेकर यांनी मानले.

      यावेळी संघाचे चेअरमन अरूण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.यु.व्‍ही. मोगले,संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, बी.आर. पाटील,डॉ प्रकाश दळवी, डॉ. साळोखे ,महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                           जनसंपर्क अधिकारी