यशवंत सेनेच्या शाहूवाडी तालुकाध्यक्षपदी रघुनाथ शिसाळ

शाहूवाडी : यशवंत सेनेच्या शाहूवाडी तालुकाध्यक्षपदी रघुनाथ शिसाळ यांची निवड करण्यात आली आहे. यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश तांबवे यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली.तसेच शाहुवाडी तालुका सचिव पदी अमित शिसाळ यांची निवड पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. संदीप हजारे, जिल्हा प्रमुख तमा शिरोळे , जिल्हा संघटक संदीप वळकुंजे , करवीर तालुका संघटक संदीप वळकुंजे ,सामाजिक कार्यकर्ते संपत रुपने, चरण गावचे ग्रा प. सदस्य भगवान शिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने चरण गावातील धनगर समाज बांधव उपस्थित होते. आभार प्रदर्शन नामदेव शिसाल यांनी केले.