जीवनधारा ब्लड बँकेचे अध्यक्ष प्रकाश घुंगुरकर यांचे निधन..

कोल्हापूर( प्रतिनिधी) :जीवनधारा ब्लड बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच रोटरी सनराइज् कोल्हापूरचे माजी अध्यक्ष प्रकाश आनंदराव घुंगुरकर वय (49) यांचे आज पहाटे अल्पशा आजराने निधन झाले.

ते सांगरुळ ता.करवीर येथील रहिवासी होते. जीवनधारा ब्लड बँकेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली होती. त्यांच्या पश्चात आई ,भाऊ,पत्नी व मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या शनिवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.