कोल्हापूर (प्रतिनिधी) सामान्य माणसाची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अल्प दरात आनंदाचा शिधा दिला जात आहे ही बाब अतिशय स्तुत्य असून राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्यांच्या घरात देखील दिवाळी सणाचे उत्साही वातावरण निर्माण होईल गरिबातल्या गरीब माणसाला देखील आपल्या परिवारात दिवाळीला गोडधोड करावे अशी अपेक्षा असते महायुतीच्या सरकारने नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हक्कांना प्राधान्य दिले आहे,

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून या उपक्रमामुळे राज्यातील लाखो परिवारांची दिवाळी गोड होणार आहे त्यामुळे आनंदाचा शिधा ही राज्य शासनाची योजना सर्वसामान्य नागरिकांना मदत करणारी व दिलासा देणारी आहे असे उदगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले.
यावेळी शिरोळ तालुक्याचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर प्रमुख उपस्थित होते,शिरोळ तालुका रेशन दुकानदार धारक संघटनेच्या वतीने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा या किटचे वाटप आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
शिरोळ तालुक्यात ५७ हजार १०० कुटुंबाना आनंदाचा शिधा या योजनेचा लाभ मिळणार आहे, शिरोळ तालुक्यातील १३९ स्वस्त धान्य दुकानातून या शिधाचे वाटप होणार आहे असे सांगताना मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आमदार यड्रावकर यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रेशन संघटनेचे उपाध्यक्ष अबू बारगीर यांनी स्वागत केले तर रेशन संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी प्रस्तावना करताना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वस्तूंविषयी माहिती दिली, अवघ्या १०० रुपयांमध्ये दिल्या जाणाऱ्या या किटमध्ये साखर १ किलो, रवा १/२ किलो, गोडेतेल १ लिटर, चनाडाळ १/२ किलो, मैदा १/२ किलो, पोहे १/२ किलो या सहा वस्तू दिल्या जाणार आहेत, यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा या किटचे वाटप करण्यात आले, देशपातळीवर झालेल्या स्पर्धेचे विजेते व उपेक्षितांसाठी काम करणारे विशाल पंजानी यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी शिरोळ तालुका रेशन संघटनेचे अध्यक्ष महादेव कदम, तालुका पुरवठा अधिकारी अरुण माळगे, गोदाम व्यवस्थापक मनोज पाटील, राजू उमराणी, मायाप्पा बेडगे, शामराव चुडाप्पा, यांच्यासह मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.