वेखंडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत दुबईवरून आणले मतदार

कोल्हापूर (प्रतिनिधी) निवडणूक कोणतीही असो इर्षा मात्र फार टोकाचीच असते. असंच इर्षच राजकारण पाहायला मिळाले ते पन्हाळा तालुक्यातील वेखंड वाडीत ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क दुबई वरून मतदारांना आणण्यात आलं. गाव मात्र छोटसं इर्षा मात्र फार मोठी असंच म्हणावं लागेल.

निवडणुकीत मतदार राजाला काय किंमत असते ते या वेखंडवाडीतील ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळाली. इर्षाच्या राजकारणात मतदार राजाची बडदास्त चांगलीच ठेवली जाते. त्याची सकाळपासून संध्यापर्यंतची पूर्णपणे काळजी घेतली जाते.

पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अशीच घटना मसाई पठाराच्या कुशित असलेल्या अगदी १२० घरांच्या वेखंडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी आज घडली. दोन मतदारांना चक्क ६० हजार रुपये प्रवास खर्च करून दुबईहून फक्त मतदानासाठी गावात आणण्यात आले होते. याची चर्चा संपूर्ण पन्हाळा तालुक्यात सुरू आहे.

वेखंडवाडी हे जेमतेम १२० घरांचे व ५६२ मतदार असलेले गाव. गेली सलग दहा वर्षे ग्रामपंचायत निवडणूक ही माजी सभापती अनिल कंदूरकर यांच्या नेतृत्वात बिनविरोध झाली होती, पण यंदा बिनविरोधची परंपरा राखण्यात अपयश आले, अन् ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची झाली.

निवडणुकीची चुरस एवढी की कामानिमित्त बाहेरगावी व परराज्यात असणाऱ्या मतदारांबरोबरच परदेशात असणारे म्हणजे दुबईतील मतदारही निवडणुकीच्या मतदानासाठी गावी आले. दुबई वरून दोन मतदान आणण्यासाठी गव्हर्नमेंट बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक संजय खोत यांनी विशेष परिश्रम घेतले.

🤙 8080365706