शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ नाट्यकलाकार अनंत कुलकर्णी व हेमसुवर्णा मिरजकर यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी)कोल्हापूर, येथील शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नाट्यकर्मी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी व नाट्यकलाकार हेमसुवर्णा मिरजकर यांचा सत्कार रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ .रवींद्र मोरे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ.गुरुदत्त म्हाडगुत होते.

या वेळी सत्काराला उत्तर देताना अनंत कुलकर्णी यांनी नाट्य चळवळीला उर्जितावस्था येण्याकरिता लोकाश्रयाची गरज आहे असे प्रतिपादन करून सदरच्या सत्काराविषयी समाधान व्यक्त केले. नाट्यपरिषदेच्या संचालक हेमसुवर्णा मिरजकर यांनी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सत्कारामुळे शाश्वत प्रतिष्ठानच्या उपक्रमांबद्दल कौतुक केले.

  यावेळी रेशन व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ .रवींद्र मोरे  ,शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ गुरुदत्त म्हाडगुत,  संचालक संतोष परब, चित्रपट निर्मिते संदीप जाधव,नाट्य परिषदेचे खजानिस गिरीश महाजन, ज्येष्ठ संचालक शिवकुमार हिरेमठ, सिध्दोजी माने सरकार, प्रकाश मिसाळ,अमोल रांगोळे यांच्यासह अनेक सामाजिक मान्यवर उपस्थित होते.
🤙 8080365706