“धैर्य फौंडेशनच्या” शिबिरात 70 जणांचा सहभाग..

दोनवडे प्रतिनिधी: साबळेवाडी ता.करवीर
येथील कै. धैर्यशील उर्फ चिक्या दिलीप पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त धैर्य फौंडेशन साबळेवाडी ( एक सामाजिक प्रकल्प) यांच्यातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

शिबीरात 70 रक्तदात्यानी सहभाग नोंदवला.
यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष अमोल गडकरी उपाध्यक्ष वैष्णवी वरपे ,युवराज पाटील,संदीप पाटील, ओंकार गडकरी, साई वरपे, अक्षय शिंदे , गौरव पाटील ,कोमल पाटील, पार्थ पाटील , सानिका पाटील आदी फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.