भान ठेवून मुलांना संवेदनशील शिक्षण देण्याची गरज: युवराज पाटील

कोल्हापूर( प्रतिनिधी) :स्वभान ठेवून मुलांना संवेदनशील मूल्यांची शिकवण देण्याची गरज आले असे मत प्रा. युवराज पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी च्या सेवानिवृत्त व गुणवंत कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक सुषमा देसाई होत्या. एम आर पाटील म्हणाले काटकसरीने कारभार केल्यानेच जि. प.कर्मचारी सोसायटीचा कर्जाचा व्याजदर 2009 पासून 24 टक्क्यावरून 8 टक्क्यावर आणून महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

जि. प.सोसायटीचे अध्यक्ष रणजित पाटील म्हणाले नियमानुसार संचालकांना दरमहा 3000 रुपये भत्ता घेता येतो परंतु आम्ही 1000 रुपयेच घेतो.सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली संस्था राज्यात अव्वल करण्याचे आयोजले आहे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई कार्यकारी अभियंता बारटक्के, विश्वास साबळे,महावीर सोळांकुरे,राजीव परीट, व्ही एन बोरगे आदी उपस्थित होते.