हातकणंगले : ग्रामपंचायत रेंदाळ प्रभाग क्रमांक 3 मध्ये शहीद भगतसिंग रोडवरील रस्त्याची दुरावस्था ही सुरुवातीपासूनच गंभीर समस्या म्हणून ओळखली जाते. डिसेंबर महिन्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेची ही समस्या जाणून घेत असताना, त्यावेळी एक अभिवचन जनतेला देण्यात आले होते, ” सदरच्या रस्त्याचे काम पूर्ण करून देऊ” सदरचा रस्ता पूर्ण करण्या कामी आमदार राजूबाबा आवळे यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात आला.
आणि याची दखल घेऊन त्याची वचणपूर्ती कार्यसम्राट आमदार राजुबाबा आवळे यांच्या आमदार फंडातून ह्या रस्त्यासाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले. गावातील विकास कार्यातील योगदानबद्दल आमदार राजुबाबा आवळे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.