आमदार सतेज पाटील यांनी जनतेला खोटे न सांगता सत्य सांगावे :  अजित ठाणेकर

कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे सोमवारी येणारे पाणी हे टेस्टिंगचे आहे. या योजनेतून पाणी मिळण्यासाठी कोल्हापूरकरांना अजून काही महिने थांबावे लागणार आहे.त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी जनतेला खोटे न सांगता या योजनेबद्दल सत्य सांगावे, अशी टीका माजी नगरसेवक अजित ठाणेकर  यांनी सोशल मीडियावरून केली आहे. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला आहे. 

व्हिडिओमध्ये ठाणेकर म्हणतात, ‘योजनेतील ४ पैकी केवळ २ पंपच अद्याप बसवण्यात आले आहेत. त्यांचेही अजून टेस्टिंग झालेले नाही. या योजनेतून जे पाणी शहरात येईल ते कसे वितरित करणार हे देखील अद्याप अनुत्तरीत आहे. कारण शहरातील सध्याची पाणी वितरण व्यवस्था कूचकामी ठरत आहे.

 गेल्या आठ दिवसांपासून शहरातील काही भागात पाणीपुरवठा होत नाही. थेट पाईपलाईनचे पाणी येणार म्हणून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. सोमवारी (ता. ३०) पाणी येणार असा खोटा दावा सतेज पाटील यांनी न करता खरी वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी. या योजनेचे श्रेय जसे तुमचे आहे, तसेच योजनेच्या विलंबाचे श्रेयदेखील तुम्हालाच जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

🤙 9921334545