सबजेल बिंदु चौक येथुन पळुन गेलेला आरोपी शाहुपूरी पोलीसांकडून जेरबंद

कोल्हापूर : सब जेल बिंदु चौक कोल्हापूर येथून दि. 27/10/2023 रोजी आरोपी नामे धनराज कुमार रा. बैजुमांझी महम्मदपुर बेला सारंग राज्य बिहार बंदी क्रं. 1612/2023 हा पळुन गेला होता. त्या अनुषंगाने राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर गु.र.नं. 740/2023 भा.द.वि.स. कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने या आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना मिळाल्या होत्या..

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा शोध घेत असताना, आज दि. 28/10/2023 रोजी संजय जाधव मिलींद बांगर, लखनसिंह पाटील व शुभम संकपाळ यांना गोपणीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती की सबजेल बिंदु चौक कोल्हापूर येथुन पळुन गेलेला आरोपी बागल चौक येथे असल्याबाबत बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे या ठिकाणी सापळा रचून आरोपीचा शोध घेत असताना एक व्यक्ती बागल चौक येथे संशयीत रित्या डोक्याला टोपी तोंडाला माक्स लावुन चालत जात असताना दिसुन आला. त्यावेळी त्याला थांबवुन त्याचा तोंडाचा मास्क काढण्यास सांगीतले असता तो पळुन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पकडुन तोंडाचा मास्क काढला असता तो सबजेल बिंदु चौक कोल्हापूर येथून पळुन गेला आरोपी धनराज कुमार हा असल्याची खात्री झाल्याने आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक महेद्र पंडीत व उप विभागीय पोलीस अधिकारी अजीत टिके यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर व सत्यवान हाक्के यांच्या मार्गदशनाखाली पी.एस.आय प्रमोद चव्हाण, सहा. फौजदार संदिप जाधव ,पोलीस अंमलदार मिलीद बांगर, विकास चौगुले शुभम संकपाळ, लखन पाटील, बाबासाहेब ढाकणे, रवी अंबेकर, महेश पाटील यांनी केली आहे.

🤙 9921334545