छत्रपती संभाजीनगर : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये, असा मजकूर शाळेच्या पाटीवर लिहीत एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आपतगाव येथे उघडकीस आली.
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर गाजत असताना विविध तरुण आत्महत्या करत आहेत. यातच गणेश कुबेर या तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना कळतच मराठा बांधवांनी एकच गर्दी केली होती. यावेळी गुणरत्न सदावर्ते याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी यावेळी नातेवाईक व गावकऱ्यांनी केली.
या घटनेनंतर मराठा समाजाच्या बांधवांची एकच गर्दी झाली होती. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र नातेवाईकांनी घेतला.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार गणेश काकासाहेब कुबेर (वय २८, वर्ष राहणार आपतगाव चित्तेपिंपळगाव) असे गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान गणेशाच्या घरी दुपारच्या सुमारास कोणी नसताना त्याने स्वतःच्या हस्ताक्षरमध्ये पाटीवर लिहिले की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नये, असा मजकूर लिहित त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.