मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक रवाना

कोल्हापूर (प्रतिनिधी )आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत अमृत कलश यात्रा च्या माध्यमातून ग्रामीण भागातून प्रत्येक घराघरातून माती व तांदूळ गोळा करून प्रत्येक गावचे कलश एकत्र करून तालुकास्तरावर एक कलश याप्रमाणे तयार करण्यात आलेले 12 तालुक्यातील 12 कलश व नगरपालिकांचा 1 कलश आणि दोन महानगरपालिकेचे 2 कलश असे एकूण 15 कलश घेऊन आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे एकूण 31 स्वयंसेवक रवाना झाले.

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आयुक्त के मंजूलक्ष्मी, आयुक्त महानगरपालिका कोल्हापूर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली सहाय्यक आयुक्त नागेंद्र मुतकेकर , तहसीलदार सूर्यकांत पाटील नेहरू युवा केंद्राच्या अधिकारी पूजा सैनि आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिवशाही बस मधून हिरवा झेंडा दाखवून त्यांना सदर कार्यक्रमासाठी रवाना केले.

31 ऑक्टोबर २०२३ रोजी दिल्ली येथे कर्तव्यपथावर होणारे कार्यक्रमासाठी हे सर्व स्वयंसेवक विशेष रेल्वेने उद्या संध्याकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.