बिद्रीसाठी पहिल्याच दिवशी ९० उमेदवारांचे ११३ विक्रमीअर्ज तर ७५३ अर्जांची विक्री…

कोल्हापूर : बिद्री येथील दुध गंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी विक्रमी ९० उमेदवारानी विक्रमी ११3 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. तर तब्बल ७५३ उमेदवारी अर्ज विक्री झाली आहे.

अर्ज दाखल झालेल्यामध्ये उत्पादन गट १ राधानगरी ८ उमेदवारांचे १२, राधानगरी गट २ मध्ये ११ जणांचे १४ ,कागल १गटात १२ जणांचे १६, भुदरगड १मध्ये ६ जणांचे ७, भुदरगड २ मध्ये ७ जणांचे१० ,करवीर ४उमेदवारांचे ४अर्ज महिला गट १९ महिलांचे २२ ,इतर मागास १२ जणांचे १२ भटक्या जाती जमाती एक जणाचे दोन अर्ज, अनुसूचित जाती गटासाठी १ अर्ज आहे असे ९०जणांनी ११३ अर्ज दाखल केलेत. ७५३ अर्ज विक्री झाली आहे. आजची अर्ज संख्या पहाता इच्छुक संख्या अधिक दिसते. तर निवडणूक बिनविरोधची शक्यता कमी आहे निवडणूक अधिकारी म्हणून विभागिय उपनिबंधक अरूण काकडे व सहाय्यक महेश शेलार हे काम पहात आहेत