या आठवड्यात कौन बनेगा करोडपती – सीझन 15 मध्ये ‘फॅमिली स्पेशल’

मुंबई : या सोमवारपासून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रतिष्ठित ज्ञान-आधारित गेमशो कौन बनेगा करोडपतीमध्ये ‘फॅमिली स्पेशल वीक’ सुरू होता आहे. 23 ऑक्टोबरपासून 2 आठवडे हे भाग चालणार आहेत. या भागांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा, नोक-झोक प्रामुख्याने बघायला मिळेल.

या आठवड्यात ‘मौर्याज’ कुटुंबातील बीना मौर्य, प्रियंका मौर्य आणि अशोक मौर्य स्पर्धक म्हणून हॉटसीटवर विराजमान झालेले दिसतील. यापैकी छिंदवाडा, मध्यप्रदेशातून आलेल्या निवृत्त शिक्षक अशोक मौर्य यांना बक्षीसाची रक्कम जिंकून आपल्या मुलीला उत्तम शिक्षण देण्याची इच्छा आहे. त्यानंतर सुनिर्मला चट्टोपाध्याय, ध्रुवरूप चट्टोपाध्याय आणि नंदिता चट्टोपाध्याय ह्यांचे कुटुंब हॉटसीटवर दिसेल. बंगळूरहून आलेल्या ऑडिटर ध्रुवरूपकडे आपल्या पत्नीचे आणि आईचे अनेक किस्से आहेत, ज्यातून त्यांचे या दोघींशी असलेल्या नात्याच्या मनोहर छटा दिसतात. यानंतर बिपेन्द्र कापरवान, देवेंद्र जुयाल आणि जितेंद्र कापरवान हे स्पर्धक येतील. अमिताभ बच्चन यांचे निःस्सीम चाहते असल्याने आपल्या टीमचे नाव ते बोल बच्चन फॅमिली ठेवताना दिसतील आणि खूप मजेदार किस्से सांगतील.

हे सगळे स्पर्धक आपल्या जीवनातील अत्यंत नाजुक आणि हृदयस्पर्शी गोष्टी सांगतील, त्यामुळे या ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्यात हृदयाच्या तारांचा एक मोहक पट प्रेक्षकांपुढे उलगडणार आहे.

!

🤙 8080365706