पुणे : कंत्राटी भरतीवरुन विरोधक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत. कंत्राटी भरतीचा निर्णय यापूर्वीही अनेकदा निर्णय झाला आहे. मात्र, एवढा प्रपोगांडा पूर्वी कधी राबवला गेल्याचे पाहीले नाही, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, कंत्राटी भरतीवरुन तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. शासन नोकऱ्या देऊन त्या लगेच काढूनही घेणार, असे सांगितले जात आहे. हे चुकीचे आहे. उलट आमच्या सरकारने दीड लाख नोकरभरतीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने असा निर्णय घेतलेला नाही.
पुढे पवार म्हणाले, राज्यात यापूर्वीही कंत्राटी भरती झाली आहे. त्यावेळी या निर्णयाविरोधात एवढा प्रपोगांडा झाला नाही. आता जाणीवपूर्वक मोठा प्रपोगांडा राबवला जात आहे. सरकारवर टीका केली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. पहिली कंत्राटी भरती कधी, कुणी केली व दुसरी कुणी केली? हे सर्व फडणवीसांनी सांगितले आहे. आता कंत्राटी भरतीवरुन विरोधक टीका करत असेल तर माफी कुणी मागायची, हेदेखील फडणवीसांनी सांगितले आहे, असा टोलाही अजितदादांनी लगावला.