२०२४-२५ पासून ‘एक राज्य, एक गणवेश ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : पुढील शैक्षणिक वर्ष म्हणेजच २०२४-२५ पासून ‘एक राज्य, एक गणवेश’ या लागू होणार आहे. सरकारच्या समग्र शिक्षण कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना समान रंगाच्या दोन गणवेशांचे वितरण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून करण्यात येणार आहे.सरकारकडून जारी अध्यादेशानुसार नवा गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप असणार आहे.

मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची अशा स्वरूपात गणवेशाचा रंग असणार आहे. त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्याच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप व दोन खिसे असणे आवश्यक करण्यात आले आहे.

🤙 8080365706