विवेकानंद महाविद्यालयात प्रसार माध्यमाचे फायदे तोटे या विषयावर गटचर्चा”

कोल्हापूर : प्रसार माध्यमाची भूमिका आणि त्याचे समाजावर होणारे फायदे तोटे या विषयावर समाजशास्त्र विभागात गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमाच्या चुकीच्या वापरामुळे लोकांची खूप मोठी फसवणूक होते तर काही वेळा प्रसार माध्यमाचा योग्य वापर केला तर अनेक वेळा समाजामध्ये होणारी फसवणूक टाळू शकतो. इंटरनेट, मोबाईलचा वापर यामुळे माणसा-माणसातील संबंध हे कमी होऊ लागले अशा पद्धतीची चर्चा यावेळी झाली. त्याचबरोबर काही विद्यार्थी म्हणाले की, सोशल मिडिया मुळे वाचन संस्कृती ही कमी होत असताना दिसून येत आहे. प्रसार माध्यमामुळे जगाच्या एका टोकाला घडलेली घटना ही तात्काळ आपल्याला समजू शकते. त्यामुळे जगात ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्या सहजपणे आपल्याला घरबसल्या सोशल मीडियाच्या वापरामुळे समजतात. प्रसारमाध्यमामुळे माणूस सतर्क होऊ लागला आहे. चुकीची होणारी घटनाही टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रसार माध्यमाचा वापर काही वेळेला फायदेशीर आहे. अशा पद्धतीचे विचार काही विद्यार्थ्यांनी मांडले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि डॉ. श्रुती जोशी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. एच्. व्ही.चामे यांनी केले तर प्रा आर्या पाटील यांनी आभार मानले. या वेळी डॉ. दादासाहेब घाडगे आणि समाजशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.