कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘केस स्टडी’ उपक्रमांतर्गत कळंबा ग्रामपंचायत, कळंबा या ठिकाणी अभ्यास भेट दिली. यावेळी कळंबा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सुमन गुरव आणि ग्रामसेवक दिलीप तेलवी यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ग्रामपंचायतीचे महत्त्व, ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणारे विकास कार्यक्रम, ग्रामपंचायतीच्या उत्त्पन्नाचे स्रोत, पंचायतीच्या सर्वसाधारण सभा, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज याची माहिती दिली.
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे नगर भूमापन कार्यालय, तलाठी कार्यालय, कृषी विभाग इत्यादी कार्यालयांना भेट देण्यात आली. या उपक्रमासाठी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि आय क्यू ए सी समन्वयक प्रा. डॉ. श्रुती जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाचे नियोजन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. समीक्षा फराकटे, प्रा. अजय पाटील आणि प्रा. अभिषेक चौगले यांनी केले. यावेळी कळंबा ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप पाटील, रोहित जगताप व राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
