पुणे: पुण्यातील ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचं रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ललितला चेन्नईमधून अटक केली आहे.ललित पाटीलला मुंबईतल्या अंधेरी कोर्टात सादर करण्यात आलं.’कोर्टातून रुग्णालयात घेऊन जात असताना त्याने माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहात मी पळालो नाही, मला पळवलं गेल,’ असं म्हटलं.मी कोणाकोणाचा हात आहे हे सांगेन, असंही त्याने म्हटलं.
दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी 11 ऑक्टोबरला ललित पाटीलचा भाऊ आणि ड्रग्जच्या कारखान्यातील पार्टनर भूषण पाटील याला अटक केली होती.ललित पाटीलला अटक केल्यानंतर आज (18 ऑक्टोबर) मुंबई पोलिस सहआयुक्तांनी पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली.या प्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक झाल्याचं त्यांनी सांगितलं. अन्वर सईद यातला पहिला आरोपी होता.
ललित पाटील हा पंधरावा आरोपी आहे, NDPS अॅक्टअंतर्गत अटक त्याला अटक झाली आहे, असं पोलिस सहआयुक्तांनी स्पष्ट केलं.यापूर्वी या प्रकरणातील तपासात 50 किलो एमडी मिळाली होती, 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज मिळाले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
