एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार नव्या दोन हजार बस

मुंबई : एसटी महामंडळानाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता महामंडळाच्या ताफ्यात नव्या 2200 गाड्या दाखल होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महामंडळाच्या खराब गाड्यांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर सातत्याने व्हायरल होत आहे. त्यानंतर आता महामंडळाने इतिहासात पहिल्यांदाच एक मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार एसटी महामंडळाकडून वर्कशॉपऐवजी गाड्या बाहेरुनच बनवून ताफ्यात सामील करण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसात यातील पहिला लॉट दाखल होईल. या सर्व गाड्या एसटीच्या मालकीच्या असणार आहेत. या निर्णयामुळं महामंडळाची मलिन प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे.