दुध दर वाढीसाठी लढा देण्याचा निर्धार…. पासार्डे चे सरपंच विष्णु पाटील …


बहिरेश्वर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने गाय व म्हैस दुध दर वाढ करावी यासाठी गावोगावी जाऊन राजेंद्र सूर्यवंशी यांनी लोकजागर चालू केला आहे. खांटागळे पाठोपाठ मौजे पासार्डे, पाचाकटेवाडी येथे देखील सर्व पक्षीय दुध उत्पादक सभासद यांनी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते.

 करवीरचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांनी दूध दरात वाढ करावी व आपल्या माता भगिनींना त्यांच्या कष्टाचे,घामाचे मोल मिळावे यासाठीआपण सर्वांनी या लढ्याला पाठींबा द्यावा असे आवाहन केले .यावेळी सर्व दुध उत्पादकांनी तुमच्या हाकेला आमची साथ असेल अशा भावना व्यक्त केल्या.. यावेळी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हात उंचावून दूध दरवाढ झालीच पाहिजे ...अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला..

व दूध दरवाढ करावी अन्यथा आंदोलनाची धार तीव्र केली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला…

याप्रसंगी सरपंच विष्णु पाटील, उपसरपंच महेश पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य, बाजीराव चौगले, सदाशिव चौगले,महालक्ष्मी सोसायटी चे चेअरमन विलास चौगले,दिलीप चौगले, विलास चौगले,बाबासो कांबळे,सागर पाचाकटे, संभाजी चौगले,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

🤙 9921334545