लाईफस्टाइल हेल्दी ठेवायची आहे…. मग योगा आहे फायदेशीर…

योगामुळे आपले मन आणि शरीर रिलॅक्स व्हायला मदत होते. रिलॅक्स होण्यासोबतच योगामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आणि आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवण्यासाठी योगा अतिशय उपयुक्त आहे.

काही जणांना असे वाटू शकते की, योगा हा फक्त वजन कमी करण्यासाठी आणि शरीर लवचिक करण्यासाठी फायदेशीर आहे. परंतु, या दोन गोष्टींसोबतच योगा हा थायरॉईडसाठी देखील फायदेशीर आहे.

योगामुळे थायरॉईड सारख्या समस्यांचे निवारण केले जाऊ शकते. मात्र, यासाठी तुम्हाला नियमित योगा करावा लागेल. शरीरातील हार्मोनल बॅलन्स सुरळीत करण्यासाठी योगा फायदेशीर ठरतो. आज आपण थायरॉईडसाठी उपयुक्त असलेल्या आणि थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर असलेल्या योगासनांबदद्ल जाणून घेणार आहोत.

थायरॉईडसाठी फायदेशीर असलेली योगासने कोणती ?

हलासन

हलासन हे योगासन मधुमेह आणि थायरॉईडची समस्या असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मात्र, हे योगासन न करण्याचा सल्ला hypothyroidism ने पीडित असणाऱ्यांना दिला जातो. कारण, हे योगासन हार्मोन्सचा स्त्राव वाढवण्याचे काम करते. त्यामुळे, फक्त थायरॉईड असणाऱ्यांना हे योगासन करण्याचा सल्ला दिला जातो.

हे योगासन करताना मानेचे चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते. तसेच, थायरॉईड ग्रंथींना उत्तेजित करण्याचे काम हे योगासन करते. त्यामुळे, थायरॉईडची समस्या असणाऱ्यांनी हे योगासन नियमितपणे करायला हवे.

सर्वात आधी सरळ पाठीवर झोपा

त्यानंतर, तुमचे दोन्ही पाय वरच्या दिशेने उचला आणि हळूहळू मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.

आता तुमच्या बोटांच्या सहाय्याने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना तुमचे दोन्ही हात जमिनीला स्थिर राहतील अशा स्थितीमध्ये ठेवा.

या अवस्थेमध्ये जवळपास १ मिनिटांपर्यंत रहा. त्यानंतर पुन्हा तुमच्या मूळ स्थितीमध्ये या. हे आसन ३ वेळा करण्याचा प्रयत्न करा.

Rules of Yoga : योगा करतायं? मग जाणून घ्या ‘हे’ महत्वाचे नियम

धनुरासन

धनुरासन हे योगासन अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. हे योगासन थायरॉईड ग्रंथीतील हार्मोन्स तयार करण्यास मदत करते आणि मासिक पाळीतील क्रॅम्प्सपासून आराम देण्यास ही फायदेशीर आहे. हे योगासन hypothyroidism ने पीडित असलेल्या व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर आहे.

धनुरासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

सर्वात प्रथम पोटावर सरळ झोपा

तुमचे दोन्ही हात आणि दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा.

आता दोन्ही पायांचे गुडघे मोडून ते कमरेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा आणि पाय दोन्ही हातांनी उलट्या दिशेने पकडा.

आता तुमचे दोन्ही पाय पुढे खेचण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना तुम्हाला ताण जाणवेल.

हा ताण शरीराला देण्याचा प्रयत्न करा आणि समोर बघा. आता याच स्थितीमध्ये तुमचा तोल सांभाळण्याचा ही प्रयत्न ठेवा.

१५-२० सेकंदांसाठी याच स्थितीमध्ये रहा. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही हे योगासन करू शकता. १५-२० सेकंदानंतर श्वास सोडा आणि पुन्हा मूळ स्थितीमध्ये या.

🤙 9921334545