कोथळी (दिगंबर संघवर्धन) : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक घेण्याची शक्यता आहे. पण त्याबाबत अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केल्या नसल्याने,सोशल मीडियावरील निवडणूक कार्यक्रमामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे. अधिकृत कार्यक्रम कधी जाहीर होणार या कडे कार्यक्षेत्रातील इच्छुक व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
बिद्री येथील श्री.दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक डिसेंबर मध्ये घेण्यात येणार आहे. परंतु शासकीय पातळीवरून निवडणूक कार्यक्रम अधिकृत जाहीर झाला नाही. त्यामुळे कार्यक्षेत्रात उलट सुलट चर्चा होत आहे. बिद्रीच्या निवडणूकीबाबत अधिकृत कार्यक्रम. योग्यवेळी जाहीर होणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
बिद्रीची निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी एक वर्ष पुढे गेली आहे. मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली होती. पण शासनाच्या 2 जूनला निवडणूक 30 सप्टेंबर घेण्याचा आदेश देण्यात आला होता.त्यामुळे 1आँक्टोबर निवडणूक प्रक्रियेत सुरुवात झाली आहे.
