कौलव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा….


गुडाळ : राधानगरी तालुक्यातील कौलव हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन, हात धुवा दिन, अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आले. शनिवार ता. 14 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्यामध्ये मुलांना वाचनाविषयी महत्त्व सांगून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक.
आर जी भोसले यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच दिपक टिपुगडे , दिगंबर संघवर्धन ,अमोल लाड, रोहित पाटील ,वाय ए चांदणे ,जी बी पाटील, बी डी गोंगाने , सरनाईक मॅडम तसेच शाळेचे मार्गदर्शक संचालक भोगावती साखर कारखाण्याचे माजी चेअरम मा. सदाशिवराव चरापले अध्यक्ष . जी बी पाटील, उपाध्यक्ष . अशोक पाटोळे सचिव. एम आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाविषयी आवड निर्माण होण्यासाठी काही पुस्तके शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी भेट म्हणून देण्यात आली अशाप्रकारे कौलव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला

🤙 8080365706