हैदराबादः तेलंगणात पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील जनतेला अवघ्या ४०० रुपयांत गॅस सिलिंडर देण्यात येईल, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी हैदराबाद येथे जाहीर केलेल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात केली आहे.
तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे(बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
या जाहीरनाम्यानुसार राज्यात सत्तेत परतल्यास सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा ‘बीआरएस’च्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रायथू बंधू या शेती क्षेत्राशी निगडित योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीमध्येही वाढ करणार असल्याचा दावा या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
राज्यातील दारिद्ररेषेखाली असणाऱ्या ९३ लाख कुटुंबांना पाच लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देण्यात येईल अशी घोषणाही बीआरएसने केली आहे. त्याचप्रमाणे कृषी आणि ऊर्जा क्षेत्रासाठी विविध योजना राबविण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीच मध्य प्रदेशमध्येही ४५० रुपयांमध्ये घरगुती गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय.
दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतनात वाढरायथू बंधू योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दहा हजार ऐवजी १६ हजार वार्षिक निधीआरोग्य श्री योजनेच्या निकषांत बसणाऱ्यांना सर्वांना १५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमाघोषणापत्रातील सर्व योजनांची अंमलबजावणी निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत करणार