कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे आज (शनिवार )14 ऑक्टोंबर रोजी माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरवात करण्यात आली. येथील पाटील ओढा येथे आज पहिला बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव सरपंच कोमल जासुद उपसरपंच सर्व सदस्य, गट विकास अधिकारी विजय यादव, सहा. गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव, विस्तार अधिकारी संदेश भोईटे,ग्राम विकास अधिकारी संजय शिंदे, महात्मा फुले आश्रम शाळेचे शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.