नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भुजबळ फार्मवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
दरम्यान आज मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा कॉल आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील भुजबळ फार्म हाऊसवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असून कार्यकर्त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची तपासणी केली जाणार असून शाईचा पेन, पावडर,आक्षेपार्ह वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.