सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यानी केली स्मशान भूमीची स्वच्छता.


बालिंगा (प्रतिनिधी) : नवे बालिंगे ता करवीर येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवक, जेष्ठ नागरिक यांनी घटस्थापनेच्या एक दिवस आधी आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून स्वच्छता हिच सेवा व संत गाडगेबाबा यांचा कानमंञ घेवून बालिंगे ग्रां पंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रेरणेतुन बालिंगे येथील स्मशानभूमीत स्वच्छता मोहिम कार्यक्रम राबविण्यात आला .

यावेळी ग्रामपंचायत सदस्य धनंजय ढेंगे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जांभळे, अजित कांबळे, युवा सेना करवीर तालुका अध्यक्ष अजय वाडकर, छत्रपती शाहू दूध संस्थेचे चेअरमन युवराज वाडकर, शतकवीर रक्तदाता – आनंदा जाधव, संभाजी पाटील, नामदेव मगदूम (सर) भाऊ घोडके, विजय ढेंगे, अंकुश माने, मुकुंद बुडके,ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश पोवार,अशोक राजेशिर्के आदींनी स्मशान भूमी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.