श्री महादेव दादोबा गाताडे विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंगळी येथील श्री महादेव दादोबा गाताडे विद्यालयामध्ये ब्रमहकुमारी विश्वविद्याय व सामाजिक न्याय मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी भक्ती बहनजी पुणे व हुपरी येथील संगीता बहनजी यांनी मादक तसेच नशेचे दुष्परिणाम किती वाईट असतात याबाबत पालकांमध्ये जागृती करण्यासाठी आवाहन केले. सुजाण व सुदृढ नागरिक बनण्यासाठी वाईट सवयी पासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक इनामदार ए. एस. यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नांगरे आर. आर. यांनी केले तर आभार कांबळे आर. पी. यांनी मानले.

🤙 8080365706