राधानगरी तालुक्यात शिष्यवृत्तीची गौरवशाली परंपरा उंचीवर नेण्यासाठी शाळा संपर्क अभियान राबवणार : : शशिकुमार पाटील

गुडाळ : राधानगरी तालुका हा शिष्यवृत्तीसाठी राज्यात अग्रेसर आहे. ही गौरवशाली परंपरा अधिकाधिक दृढ करण्यासाठी शाळा संपर्क अभियान राबवले जाईल, त्यामुळे जास्तीत जास्त मुले गुणवत्ता यादीत येण्यासाठी शिक्षकांशी सुसंवाद साधला जाईल असे उद्गार राधानगरी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आणि शिष्यवृत्तीचे भीष्माचार्य शशीकुमार पाटील यांनी काढले.ते कुडूत्री येथे आयोजित शाळा भेट आणि सदिच्छा सत्कार कार्यक्रमात बोलत होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप चव्हाण यांनीकेले.

कार्यक्रमात नूतन शिक्षण विस्तार अधिकारी आनंदा कडगावकर यांचा सत्कार दिलीप चव्हाण यांच्या म हस्ते तर शिक्षण विस्तार अधिकारी शशिकुमार पाटील यांचा सत्कार मधुकर मुसळे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पी एन जाधव , मधुकर मुसळे, मुख्याध्यापक दिलीप चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी आनंदा कडगावकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास उदय पाटील , विद्या आरडे यांच्यासह विद्यार्थी म उपस्थित होते . शेवटी आभार उदय म पाटील यांनी मानले.

🤙 9921334545