व्यभिचार केल्याप्रकरणी क्रिस्टीआनो रोनाल्डोला 99   फटक्यांची शिक्षा ; ईराणमध्ये  बंदी 

 नवी दिल्ली : पोर्तुगालचा सुप्रसिद्ध खेळाडू क्रिस्टीआनो रोनाल्डो  याच्या भविष्यात इराणला जाण्याच्या अडचणी वाढ झाली आहे. कारण की, क्रिस्टीआनो रोनाल्डो भविष्यात इराणला गेल्यास त्याला व्यभिचार केल्याप्रकरणी 99 फटाक्यांची शिक्षा भोगावी लागू शकते.

कलाकार फातिमा हमीमी हिला भेटीदरम्यान चुंबन करत मिठी मारल्यामुळे इराणकडून रोनाल्डोवर ही कारवाई करण्यात येऊ शकते. इतकेच नव्हे तर, पुढे जाऊन यामुळे रोनाल्डोला इराणमध्ये येण्यास बंदी देखील घातली जाऊ शकतो, असा दावा इराणच्या माध्यमांकडून करण्यात येत आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये आशियाई चॅम्पियन्स लीगच्या सामन्यासाठी क्रिस्टीआनो रोनाल्डो याने अल-नासरसह इराणची राजधानी तेहरानला भेट दिली होती. याठिकाणी त्याची भेट पोर्तुगीज आंतरराष्ट्रीय इराणी चित्रकार फातिमा हमीमीशी देखील झाली. या भेटीदरम्यान हमीमीने रोनाल्डोला खास अशी दोन चित्रे भेटवस्तू म्हणून दिली जी फक्त त्याच्यासाठी तयार करण्यात आली होती. यानंतर रोनाल्डोने हमीमीला चुंबन दिले तसेच तिला मिठी देखील मारली. मात्र असे कृत्य करणे इराणमध्ये व्यभिचाराचे उल्लंघन करण्याइतपत चुकीचे मानले जाते. त्यामुळेच रोनाल्डोला ही शिक्षा भोगावी लागू शकते.

सध्या याप्रकरणीच भविष्यात रोनाल्डो इराणला गेल्यानंतर त्याला 99 फटक्यांची शिक्षा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, रोनाल्डोने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितल्यानंतर त्याची ही शिक्षा रद्द देखील होऊ शकते. परंतु अद्याप यावर रोनाल्डोकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. दरम्यान, रोनाल्डो आणि हमीमी यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये रोनाल्डो हमीमीला मिठी मारत उभा असलेला दिसत आहे. त्याने केलेल्या या कृतीवरच इराणमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ज्यामुळे आता त्याला याप्रकरणी शिक्षा देखील भोगावी लागू शकते.