तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन

मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या  141 व्या अधिवेशनात याची घोषणा करण्यात आली.

हे अधिवेशन मुंबईत आयोजित केले गेले होते. त्यामुळे 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणा-या ऑलिम्पिकमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना चाहत्यांना पहायला मिळणार आहे. दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिलांची स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये असेल. या स्पर्धेत किती संघांना समाविष्ट केले जाईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

याआधी ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदाच क्रिकेट खेळले गेले आहे. 1900 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा सुवर्णपदकासाठीचा सामना पॅरिसमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिकेटला ऑलिम्पिकचा भाग बनवल्यामुळे दक्षिण आशियाई प्रेक्षकांना आकर्षित करण्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला यश येईल. तसेच प्रसारण करारातून मोठी रक्कम कमवण्याची संधी मिळेल असा असा विश्वास आहे.

🤙 9921334545