बिद्री ,भोगावतीचे बिगुल वाजले..!

कोल्हापूर: जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या व दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे भोगावतीची निवडणूक 19 नोव्हेंबरला तर बिद्रीची निवडणूक 3 डिसेंबरला होत आहे.

याबाबत प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला आहे. भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीला प्रशासनाने स्थगिती दिली होती ती स्थगिती 30 सप्टेंबरला उठवली व मागील प्रक्रिया पुढे चालू ठेवली आहे. या कारखान्याचे अर्ज अगोदरच दाखल झाले आहेत तसेच त्याची छाननी ही झाली आहे . आता 19 नोव्हेंबरला मतदान तर 20 नोव्हेंबरला मतमोजणी शक्य आहे तसेच बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याचा कार्यक्रम आज जाहीर झाला.26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. 2 नोव्हेंबरला छाननी , 3 नोव्हेंबर ला उमेदवारी यादी प्रसिद्ध होणार आहे. 3 डिसेंबर ला मतदान होत आहे तर 5 डिसेंबरला मतमोजणी होत आहे. या दोन्ही ही निवडणूका चुरशीच्या होणार आहेत. दोन्ही कारखान्याच्या निवडणूका दुरंगी किंवा तिरंगी होण्याची शक्यता आहे.