पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणी चौकशी समिती गठीत :मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील ड्रग्ज प्रकरण व त्यासंबधीत घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्याकरीता चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील ड्रग्ज प्रकरण चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत.सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख,नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे न्यायवैद्यक शास्त्रविभाग
प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. हेमंत गोडबोले,मुंबई ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिव्यंगोपचार शास्त्रविभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

समितीने सखोल चौकशी करून आपला सविस्तर अहवाल १५ दिवसात शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.