हद्दवाढी विरोधात १८ गावे आक्रमक…

बालिंगा( प्रतिनिधी) बालिंगा तालुका करवीर येथे आज सर्व फक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळला आहे. या बंदमध्ये सर्व ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत हध्दवाढ कृती समितीच्या वतीने ग्रामपंचायत बालिंगा पासून गावच्या मुख्य रस्त्यावर पर्यंत येऊन हद्दवाढी विरोधात घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडुन आक्रमक झालेले दिसून येत होते .

कोणत्याही परिस्थितीमध्ये शासन कितीही दबाव आणत असेल तर त्याला आमचा ठाम विरोध राहील असे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे तसेच भाजपचे अमर जत्राटे काशिनाथ माळी यांनी आपल्या भाषणामध्ये नमुद केले.

तसेच महानगर पालिकेस आपले उपनगरात सेवा सुविधा पुरवु शकत नाही तर हध्दवाढ करून काय सेवा सुविधा देणार असा प्रश्न उपस्थित करून तीव्र शब्दात हद्दवाढीस आपला विरोध असल्याचे यावेळी नमुद केले.

या हद्दवाढीला विरुद्ध दर्शविण्यासाठी साठी बालिंगे गावचे तंटामुक्त अध्यक्ष अनिल पवार ,शाहू विकास सोसायटीचे अध्यक्ष एम. एस. भवड आबा ग्रामपंचायत सदस्य अजय, भवड, धनंजय ढेंगे, नंदकुमार जांभळे, पांडू वाडकर,अजय वाडकर, श्रीकांत भवड ,प्रकाश जांभळे,उपसरपंच पंकज कांबळे ,विजय जांभळे, बाजीराव जांभळे ,सर्जेराव भवड, जनार्दन जांभळे, विश्वास जांभळे ,रंगराव भवड ,मावू जांभळे ,प्रशांत सुतार इत्यादी सह नागरिकांनी आपला प्रचंड सहभाग नोंदविला होता.

हध्दवाढविरोधात घोषणा देत आपल्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ही समिती करीत आहे. त्याच बरोबर शिरोली पुलाची, नागाव, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी ,उजळवाडी ,कळंबे तर्फे ठाणे ,उचगाव वाडी पीर, आंबेवाडी, वडणगे ,शिंगणापूर, नागदेववाडी तसेच शिरोली व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत हे अठरा गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक आपापल्या गावांमध्ये बंदमध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हद्द वाढीस आपला विरोध राहील या करीता या बंदमध्ये आपला सहभाग नोंदविला होता..

🤙 8080365706