शुभमन गील – सारा यांच्यातील अफेअरची चर्चा पुन्हा एकदा रंगली

मुंबई : सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची नेहमी चर्चा होत असते. सारा आणि शुभमन यांच्या डेटिंगवरुन अनेकदा काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. मात्र काही दिवसांपासून या दोघांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत.

मात्र साराने सध्या तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गिलसाठी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे सारा आणि शुभमन गिल यांच्यातील अफेअरबाबत आणखी चर्चा रंगली आहे.

भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलला डेंग्यू झाला आहे. यामुळे शुभम वर्ल्ड कप मॅचमधून बाहेर आहे. हा क्रिकेटर लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिने देखील शुभमन लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. साराने शुभमनसाठी पोस्ट शेअर केली आहे. साराची एक्स पोस्ट सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. साराने पोस्ट करून लिहिले आहे की, शुभमन तु लवकर बरा हो. साराच्या या पोस्टला 4.7 मिलियन व्ह्यूज आणि 104.2 लाईक्स मिळाले आहेत. सारा आणि शुभमनची जोडी चाहत्यांना खूप आवडते.